akola government silent on cotton procurement! Millions of quintals of cotton are on the verge of collapse at home 
विदर्भ

कापूस खरेदीबाबत सरकारची चुप्पीच! लाखो क्विंटल कापूस घरातच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : शेतकऱ्यांचा सर्वच कापूस सरकारने खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी तसेच शेतकरी संघटनांकडून होत आहे. परंतु अजूनपर्यंत 'नॉन एफएक्यू' कापूस खरेदीबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, कापूस उत्पादक आर्थिक कोंडित सापडला आहे.


जिल्ह्यामध्ये खरिपात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तर, रब्बीमध्ये हरभरा गव्हाचे प्रमुख्याने पीक घेतले जाते. त्यातही खरिपात सोयाबीन व कापसाचे सर्वाधिक (जवळपास चार लाख हेक्टर) क्षेत्र राहते. त्यानुसार जिल्ह्यात सोयाबीन तसेच कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु गतवर्षी पावसाचा लहरीपणा व अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र कपाशीपासून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती.

गेल्या वर्षी जवळपास दीड लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. पाऊसही अधिक झाला व गुलाबी बोन्डअळीचा प्रादुर्भावही कमी होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी झाले. परंतु, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापसाची प्रत खालावली. मात्र सरकार शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करून त्यांना दिलासा देईल, असा कापूस उत्पादकांना विश्वास होता. परंतु सरकारकडून केवळ 'नॉन एफएक्यू' कापसाची खरेदी केली जात असल्याने, कापूस उत्पादकांचा अपेक्षा भंग झाला.

सीसीआय व पणन महासंघाकडून सध्या केवळ एफएक्यू कापसाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून असून, वाढत्या तापमानात त्याला कीड लागून तो खराब होत आहे. आधिच दोन्ही हंगाम हातून गेले आता कापूसही उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, शेतकऱ्यांना या कोंडीतून सोडविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा सर्वच दर्जाचा संपूर्ण कापूस खरेदी करावा, अशी मागणी, राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना, लोकनेत्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. परंतु अजूनपर्यंत शासन स्तरावरून या विषयी कोणताच सकारात्मक निर्णय घेतलेला नसल्याने कापूस उत्पादक चिंतातूर झाले आहेत.

कापूस खरेदी प्रक्रियेबाबत तसेच प्रक्रियेतील अटी, निकषासंदर्भात शासन स्तरावर निर्णय होतात. नॉन एफएक्यू कापूस खरेदी संदर्भात अजूनपर्यंत शासनस्तरावरून कोणतेही निर्देश नाहीत. या संदर्भात काही अधिकृत आदेश प्राप्त झाल्यास, त्यानुसार कापूस खरेदी प्रक्रिया राबविली जाईल. सध्या जिल्ह्यात सीसीआय व पणन महासंघाद्वारे नोंदणीनुसार एफएक्यू कापसाची खरेदी सुरू आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT